बेघर व्यक्तींना निवडणूक ओळखपत्रांचे वाटप !
कल्याण, ( शंकर जाधव) : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील बेघर व्यक्तींसाठी कल्याण पश्चिमेतील ३/क प्रभागात, आणि डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी तसेच टिटवाळा परिसरात बेघर निवारा केंद्राची व्यवस्था केली आहे.
काल जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावली निवारा केंद्र येथे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव यांनी निवडणूक ओळखपत्रांचे वाटप केले आणि या व्यक्तींना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.