जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत विविध विषयांत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
Coffee with CEO या उपक्रमांतर्गत झालेल्या या विशेष संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक, सृजनशील आणि नावीन्यपूर्ण अनुभव मांडले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना संपूर्ण वातावरण आनंदी आणि प्रेरणादायी झाले.
करनवाल यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला उत्तेजन देत त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या विचारांची दिशा आणि समाजाबद्दलची जाणीव स्पष्ट होते. असे उपक्रम त्यांना नवनवीन संधींच्या दाराशी नेणारे ठरतात,” असे त्या म्हणाल्या.
स्थानिक शिक्षण क्षेत्रासाठी हा उपक्रम एक नवा पायंडा ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया पालक व शिक्षक वर्गातून उमटत आहे.