Kolhapur : मोटारसायकल चोर अटकेत

 



कोल्हापूर, (शेखर घोंगडे) : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धरपकड मोहीम अजून सुरूच असून पाचवी यशस्वी कामगिरी करताना या आठवड्यात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटारसायकल चोरटे तसेच पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

 कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसी येथील चोरीच्या २ मोटारसायकली व गुन्हा करणेसाठी वापरलेली १ मोटारसायकल अशा एकूण ३ मोटारसायकली जप्त करत एकूण १,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर अन्य एका कारवाईमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यांत वाढ झाली आहे. 


घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारींना मार्गदर्शन करून गुन्हेगारीला अटकाव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आक्रमक भूमिका घेत एका पाठोपात एक गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले असून मातब्बर गुन्हेगारांची धरपकड केली जात असून, यातून विविध गुन्ह्यांमध्ये आवश्यक असलेले गुन्हेगार सापडत आहेत.


 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून तसेच तांत्रीक व गोपनीय माहितीचे आधारे तपास केला जात आहे, यात मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळालयांतर, चोरीची मोटर सायकल विक्री करीता एक इसम कसबा बावडा ते वडणगे जाणारे राजाराम बंधारालगत असलेल्या किनारा हॉटेल येथे येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, या आधारे पोलिसांनी सापळा रचला व यात गणेश संभाजी पोवार (२५, रा. पडळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हा अलगद सापडला. याला विना नंबरप्लेट स्प्लेंडर बाईकसह ताब्यात घेतले. त्याचेकडील स्पेलडर मोटारसायकल ताब्यात घेतली असता, ती चोरीची आढळून आली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल असलेचे समजले.

त्यानंतर आरोपी गणेश संभाजी पोवार यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने शिरोली एमआयडीसी परिसरातून आणखीन एक मोटारसायकल चोरी केलेची कबूली त्याने दिली. ती चोरीची टीव्हीएस स्टार कंपनीची मोटर सायकल जप्त करणेत आली आहे. आरोपी गणेश पोवार याने गुन्हा करणेसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल देखील जप्त करणेत आलेली आहे. या कारवाईत दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित सारे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, रामचंद्र कोळी, सागर चौगले, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात पिंगळे, राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post