एकूण २४१ नामनिर्देशन पत्रांचे वाटप
डोंबिवली ( शंकर जाधव) : ठाणे विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून गुरुवारी ठाणे विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण १७ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले तर एकूण २४१ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
१३४ भिवंडी विधानसभा मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार मनिषा रोहिदास ठाकरे व स्नेहा देवेंद्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे सादर केला. तर आज एकूण ४ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १३५– शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार (अजित पवार गट) दौलत भिका दरोडा यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार (अजित पवार गट) शर्मिला अमोल शेळके यांनी उमेवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मुंडके यांच्याकडे सादर केले. तर आज एकूण १३ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १३६ – भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आज एकूण ०९ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १३७– भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आज अपक्ष उमेदवार रुपेश लक्ष्मण म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांच्याकडे सादर केला. तर एकूण ३० नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १३८- कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आज एकूण ७३ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
१३९ – मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अंजली पवार यांच्याकडे सादर केला. तर एकूण ७ नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यात आले. १४० - अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून एकूण २५ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १४१ - उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून आज एकूण 8 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १४२- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्याकडे सादर केला. तर एकूण ९ नामनिर्देशन पत्रांचे वाटप आज करण्यात आले.
१४३ -डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आज एकूण ३ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १४४- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार प्रमोद रतन पाटील यांनी तर उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे सादर केला. तर आज एकूण ५ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
१४५ मीरा - भाईंदर विधानसभा मतदारसंघातून मतदारसंघातून अपक्ष उमेदवार हंस कुमार पांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भुताळे यांच्याकडे सादर केला. तर २४ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन बहुजन सेनेच्या उमेदवार सुशीला काशिनाथ कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्याकडे उमेदवारी सादर केला तर एकूण ११ नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले.
१४८ - ठाणे विधानसभा मतदारसंघातून उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे उमेदवार राजन विचारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे सादर केला. तर आज एकूण ७ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. १४९- कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार (शरदचंद्र पवार) जितेंद्र सतीश आव्हाड यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे सादर केला. तर आज ०७ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
१५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आज अर्ज नेणाऱ्यांची ० आहे. १५१ - बेलापूर विधानसभा मतदारसंघातून आज दोन अपक्ष उमेदवार गुरू नरसिंह सुर्यवंशी व विजय नाहटा यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे सादर केला. तसेच आज एकूण ६ नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले.