महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या टिटवाळ्यातील प्रचार फेरीला जोरदार प्रतिसाद

 



डोंबिवली ( शंकर जाधव) : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर साहेब यांनी निवडणुकीसाठी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी टिटवाळा येथील मांडा टिटवाळा परिसरात प्रचार फेरी काढून त्यांनी इथल्या स्थानिक जनतेशी संवाद साधला. तसेच मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती देत आणखी एक संधी देत परत एकदा निवडून देण्याचे आवाहन केले.


 महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर साहेब यांनी मांडा टिटवाळा येथील प्रभाग क्रमांक ८, तसेच आजूबाजूच्या परिसरात दिवसभर प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. या रॅलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक मयूर पाटील, संजय पाटील, नगरसेवक संतोष तरे, उपशहर प्रमुख विजय देशेकर, युवासेना उपशहर प्रमुख विकास भोय, महिला उपशहर संघटक सुषमा शर्मा, उपविभाग प्रमुख बबलेश पाटील, नितीन सिंग, शाखाप्रमुख किरण पाटील, अशोक चौरे, विजय भोईर, हरीश कांबळे, प्रल्हाद पाटील, निता देशेकर यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post