दिव्यांच्या प्रकाशात उजळले 'भैरवनाथ मंदिर'

 


भैरवनाथ मंदिरात दिव्यांची आरास 

अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील भैरवनाथ मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिर व तलावपालीवर १ हजार एकशे अकरा दिवे प्रञ्चालित करण्यात आले. या दिव्यांच्या प्रकाशात मंदिर न्हाऊन निघाले. शिवभैरव भजन मंडळ गेली ९ वर्षे हा उपक्रम राबवित आहे- मंदिर परिसरात दिव्यांची आरास करण्यात आली होती.

यावेळी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. या रोषणाईचे समोरच्या तलावात पडणारे प्रतिबिंब त्याचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा दीपोत्सव अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहाबाज ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले. ह.जो. पाटील आणि समम राम भगत यांची खास उपास्थती होती. तन्मय भगत याने ड्रोन कॅमेऱ्याने मनमोहक दृश्ये टिपली.





Post a Comment

Previous Post Next Post