दिवा \ आरती परब : साबे विभागातील कोकणरत्न ७ ते ८ चाळ परिसरातील गटार व पायवाटांच्या विकासकामांचे आज नारळ फोडून विधिवत भूमिपूजन करण्यात आले. हे काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या निधीतून तसेच माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या विशेष प्रयत्नातून मार्गी लागले आहे.
या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या गटार व पायवाटांच्या समस्या दूर होणार असून दैनंदिन वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत स्थानिक विकासाला गती देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
भूमिपूजन सोहळ्यास स्थानिक विभागप्रमुख गुरुनाथ पाटील, निलेश पाटील, अर्चना पाटील, शाखाप्रमुख निरंजन चुडणाईक, जयसंतोष सावंत, अमृत दुमडे, उदय पाटील, कुंदन पाटील, मोहित गुप्ता, ओंकार खोत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


