वासुदेवांच्या वेषात महायुतीच्या प्रचारासह मतदारांमध्ये जनजागृती



डोंबिवली ( शंकर जाधव )  : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला पहायला मिळत आहे. 




अशा परिस्थितीत राजकीय उमेदवार वेगवेगळ्या मार्गांनी मतदारांपर्यंत पोहचत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेत पारंपरिक वासुदेवाच्या वेषामध्ये मतदारांशी संपर्क साधून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.





 तसेच मतदान हा लोकशाहीने नागरिकांना दिलेला सर्वात मोठा सण असून अधिकाधिक मतदारांनी आपले हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची विनंतीही या वासुदेवांनी केल्याचे दिसून आले.




Post a Comment

Previous Post Next Post