मतदारांना आपला लाेकशाहीचा हक्क बजाविण्याचे आवाहन
एकूण १० दखलपात्र व १५ अदखलपात्र गुन्हे दाखल
२३ अग्निशस्त्रे व ३६ काडतुसे जप्त
काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : सध्या विधानसभा निवडणूकीचे महाराष्ट्रात पडघम सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर १५ आँक्टाेबरपासून आदर्श आचारसंहितेचे पालन करताना सांगली, काेल्हापूर, सातारा,साेलापूर, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यातील पाेलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पाेलीस यंत्रणा, अधिकारी पाेलीस यांच्यासह अन्य संलग्न विभागाने आपले कर्तव्य व जबाबदारी अत्यंत पारदर्शक आणि अचूक पार पाडली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक काळात वाटली जाणारी अवैध दारू, राेख रक्कम, अमली पदार्थ, दारू, अवैध रक्कम, गिफ्ट यांची देवाणघेवाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १९ काेटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचबराेबर प्रतिबंधात्मक कारवाई, गुन्हेगारी करणाऱ्या टाेळी, फरारी आराेपी यांना देखील पकडण्याची कामगिरी पाेलिसांनी यशस्वी केली आहे, अशी माहिती काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिली. ते काेल्हापूर येथील आयाेजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. ही निवडणूक निःपक्षपाती, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी पाेलीस विभागातर्फे सर्वतोपरी उपाययाेजना करण्यात आली असून, मतदारांनी आपला लाेकशाहीचा हक्क बजवावा, असेही शेवटी पाेलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आवाहन केले आहे.
यावेळी सुनिल फुलारी अधिक माहिती देताना म्हणाले की, आजस्थितीला पाेलिसांसह अन्य सलंग्न शासकीय विभागाची कामगिरी उत्तमरित्या पार पाडली जात आहे. यामध्ये महसूल, वनविभाग, आयकर, आरटीओ विभाग यांचीही मदत मिळत आहे. पाेलीस यंत्रणेने आतापर्यंत एकूण १० दखलपात्र व १५ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. २३ अग्निशस्त्रे व ३६ काडतुसे जप्त केली आहेत. केंद्रीय निवडणूक आयाेगाच्या निर्देशाचे पालन करताना पाेलीस यंत्रणेने ही कारवाई केली असून, निवडणूक संपेपर्यंत ही कारवाई केली जाईल असेही विशेष पाेलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी स्पष्ट केले. आवश्यक त्या ठिकाणी काेबिंग ऑपरेशनह तसेच नार्काेटिक्स श्वानाचाही उपयाेग केला जात आहे.
आंतरराज्य चेकपाेस्टवर देखील सर्व पाेलीस यंत्रणा व अन्य शासकीय विभाग अलर्ट असून कनार्टक, गाेवा पाेलिसांसाेबत समन्यव्य साधून इथेही सर्वाेतपरी लक्ष ठेवून, आवश्यक त्या निवडणुकीच्या दृष्टीने कारवाई करण्यात आल्याचे फुलारी यांनी सांगितल. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदाेबस्ताची माहिती देताना फुलारी यांनी सांगितले की,
आंतरराज्य चेक पाेस्ट नाक्यांवर केंद्रीय दलाचे हाफ सेक्शन तैनात केले आहेत. कर्नाटक राज्याकडून १० हजार हाेमगार्डस पुरविण्यात आले असून, त्यांची नेआण करण्याकरिता बसेस व निवास, तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाेलीस महासंचालक कार्यालयाकडूनही परिक्षेत्रातील घटकांना एकूण ६९३९ हाेमगार्डस बंदाेबस्तासाठी पुरविले असून, केंद्रीय दलाच्याही CRPF,BSF,ITBP, SSB यांच्या ३० कंपन्या परिक्षेत्रासाठी देण्यात आले असून, हरयाणा, व राज्य राखीव दलाच्या अन्य राखीव १४ आरपीएफच्या तुकड्या पुरविल्या आहेत. यंत्रणेतील काेणीही अधिकारी, पाेलीस कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्या टपाली मतदानाची सुविधा करण्यात आली असून ही निवडणूक निःपक्षपाती, निर्भिड वातावरणात पार पडण्यासाठी पाेलीस विभागातर्फे सर्वाेतपरी उपाययाेजना करण्यात आली असून, मतदारांनी आपला लाेकशाहीचा हक्क बजावावा.
सुनिल फुलारी, पाेलीस महानिरीक्षक