आ. राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांच्या शुभेच्छा


कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरतो. या वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक कार्याची किनार देत शिवसैनिकांकडून विविध उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाचा वाढदिवस आमदार राजेश क्षीरसागर आणि समस्त शिवसैनिकांसाठी दुग्धशर्करा योग ठरला आहे. कालच विधानसभेच्या निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांनी २९ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यामुळे निकालाचा आणि वाढदिवसाचा जल्लोष शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कोल्हापूर येथे कालपासूनच पहायला मिळत आहे. 

आज मुंबईसाठी जावे लागणार असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री १२ वाजताच आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिक, हितचिंतकांसमवेत केक कापून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. रात्री उशिरापर्यंत शिवालय येथे आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरच्या जनतेने, महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मला एक दिवस आधीच वाढदिवसाची अनोखी भेट दिली असून, ही भेट आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. कोल्हापूरवासीयांनी दाखविलेल्या प्रेमाचे ऋण कामाच्या माध्यमातून फेडण्यासाठी मी तत्पर असेन. येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेवून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली.

आज २४ नोव्हेंबर रोजी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना राजारामपुरी विभागाच्या वतीने पांजरपोळ येथे युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गोमातेचे पूजन करून गाईना डाळ, गुळ, चारा वाटप करण्यात आले. यावेळी मंदार तपकीरे,दुर्गेश लिंग्रज,कमलाकर जगदाळे. करण जाधव, दादू शिंदे, अश्विन शेळके, अमर निंबाळकर,आसिफ मुलांनी, जयराज निंबाळकर, संकेत तोरस्कर, अर्जुन बुचडे, संदीप यादव, प्रसाद माजगावकर प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर शिवसेना शहर वतीने कोल्हापूर थाळी, सीपीआर चौक येथे मोफत अन्नदान करण्यात आले. यासह येणाऱ्या दोन तीन दिवसात अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रमांचे विविध विभागांच्या वतीने आयोजन करण्यात येणार आहे.  



आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

शिवसेना मुख्यनेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या. यासह उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, युवा सेना अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत,  गुलाबराव पाटील, संजय राठोड, तानाजी सावंत, शंभूराजे देसाई,हसन मुश्रीफ, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक, माजी आमदार जयश्री जाधव, सत्यजित कदम यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांना सकाळी लवकरच मुंबई साठी रवाना व्हावे लागल्याने दिवसभरात शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिक, हितचिंतक आणी महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा प.म.देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, स्नुषा दिशा क्षीरसागर, युवासेना कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांनी स्वीकारल्या.

Post a Comment

Previous Post Next Post