अग्नी तांडवात उद्ध्वस्त झालेल्या घटनास्थळाची केली पाहणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण येथील जोशी पाडा येथील माणेरे गावातील रहिवासी रघुनाथ दामा जोशी यांच्या घराला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घरात झोपलेले २७ जण थोडक्यात बचावले,आगीच स्वरूप इतकं भीषण होत की यात संपूर्ण घराचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली. नुकसानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले.या दुःखद प्रसंगातून जोशी कुटुंबियांना त्यांचे पुनर्वसनासाठी माझ्याकडून सर्व आवश्यक ती मदत मी सढळ हस्ते करेन, असे आश्वासन आमदार सुलभा गायकवाड यांनी पीडित कुटुंबाला दिले. यावेळी माणेरे गावचे विजयी जोशी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.