लोकसभा - विधानसभेचा वचपा पालिका निवडणुकीत काढू




मनसे नेते प्रमोद ( राजू ) पाटील यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  पक्षाची एकही सीट आली नाही, आता हा विषय संपला आहे.ज्याप्रकारे या विधासभेचा निकाल आला आहे.आपण सर्व राज साहेबांचे सहकारी आहोत.आताते  पालिकेची निवडणूक लवकर लावतील.आपल्यातील काहींना पालिकेच्या निवडणुका लढावायची असतील.

मन सैनिकांनो खचून जाऊ नका.पालिकेच्या निवडणुकीत दुपटीने वचपा काढू.आपण तयार रहायाचे आहे. आपल्याला कोणाच्या भरोशावर राहायचे नाही. कल्याण जिल्हाध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु करा. आपल्या सर्व सीट लढावायच्या आहेत.या निवडणुका पूर्वीसारख्या नाहीत. आपल्या गृहीत धरलं जात आहे असे मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले. डोंबिवलीत मनसैनिकांना मार्गदर्शन करतांन ते बोलत होते.




Post a Comment

Previous Post Next Post