रिपाईचा शिवसेना पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर यांना पाठिंबा

 


डोंबिवली ( शंकर जाधव ):  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला आहे.  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्याचा विश्वास रिपाईने यावेळी व्यक्त केला आहे.

रिपाईचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रमेश भागे तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत रसाळ, कल्याण तालुका अध्यक्ष नेताजी कांबळे, कल्याण शहर अध्यक्ष राजेश जाधव यांनी अशा आशयाचे पाठिंबा पत्र सुभाष भोईर यांना दिले आहे. सुभाष भोईर यांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याची ग्वाही यावेळी नेत्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post