उदगाव पुलावरून चारचाकी कोसळून तिघे जागीच ठार




शिरोळ,कोल्हापूर ( शेखर धोंगडे) : उदगाव तालुका शिरोळ येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. या अपघातात सांगलीचे तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली.


पती प्रसाद भालचंद्र खेडेकर (३५) व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर (३६) व वैष्णवी संतोष नार्वेकर ( २१) हे तिघे ठार झाल्याची घटना घडली. तर समरजीत प्रसाद खेडेकर (७), वरद संतोष नार्वेकर  (१९) व साक्षी संतोष नार्वेकर (४२) हे सर्व सांगली येथे राहणारे असून हे तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीस अपघातस्थळी  धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान याच ठिकाणी आतापर्यंत तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post