डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांचा विजयी चौकार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली विधानसभा मतदार संघ हा भाजपाचा बाल्लेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण हे यांनी चौथ्यादा जिंकले. चव्हाण यांच्या विजयाची घोषणा होताच क्रीडा संकुल बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
विजयी उमेदवार रवींद्र चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, डोंबिवली मतदार संघाचा विजय हा विचारधारेचा विजय आहे सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत दोन महिन्यात केली.नेहमीच सांगतो हे शहर महायुतीचा बालेकिल्ला राहिला असून चौथ्यादा सिद्ध झाला आहे. गेली चाळीस वर्ष जनसंघाने हा बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे.मी मतदाराचे खूप खूप आभार मानतो. खरं तर महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ते पेटून कामाला लागले होते. हा निर्णय मतदारांनी दिला आहे.
चौकट
महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण - १२३८१५
महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे - ४६७०९
रवींद्र चव्हाण यांची ७७१०६ ची आघाडी