राजेश क्षीरसागर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांनी केलेली विकास कामे आणि लाडकी बहीण योजना यामुळेच आमचा विजय निश्चित आहे. लाडक्या बहिणींनी भरभरून उत्स्फूर्तपणे आणि अतिशय आनंदाने आमच्या विजयाचा वाटा उचलला उचलला आहे. अशी प्रतिक्रिया कोल्हापुर येथील उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी काढले.
शिवालय भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये क्षीरसागर बोलत होते. कोल्हापूरमध्ये आम्हाला शांतता राखायचे आहे कोल्हापूरचा मोठा विकास करावयाचा आहे जनतेची सर्व स्वप्न पूर्ण करण्याचा विडा आम्ही महायुतीने उचलला आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनाही इशारा दिला.
मतदानाच्या दिवशी त्यांनी जो प्रकार घडविला, जमावाच्या आडून लाठी काठी घेऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.माझा अंगरक्षक व कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.हा सर्व प्रकार संपूर्ण कोल्हापूर्वासियांनी पाहिला आहे. स्वतःचा पराभव दिसू लागल्यानेच त्यांच्याकडून असे वर्तणूक घडले आहे. यावेळी त्यांनी हिसाव चुकता करू अशी जी भाषा वापरली, त्यालाही प्रत्युत्तर देताना क्षीरसागर म्हणाले की, निवडणूक, मतदान हे एक दिवसासाठी असते. माझेही कार्यकर्ते माझ्यासोबत होते. आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते. मात्र आम्ही संयम राखला. अशा जमावाच्या घटनेतून एखादा अनुचित प्रकार घडतो. मृत्यू होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संसार उध्वस्त होतो. अशी घटना घडू नये, म्हणून आम्ही काळजी घेत होतो. मात्र, खून घडविणे, तीव्र विरोध करणे, मारहाणीच्या घटना करविणे या सवयी पूर्वी पालकमंत्री, गृहमंत्री असलेले सतेज उर्फ बंटी पाटील यांनाच आहेत. त्यामुळे आम्हीच अनुचित प्रकार घडू नये .मारहाणीत मोठी घटना घडू नये यासाठी आम्ही संयम राखला अशा घटनेतून एखाद्याचे कुटुंब उध्वस्त होतं असे क्षीरसागर म्हणाले.
खरं तर मला मोठी सिक्युरिटी आहे. पण निवडणुकीच्या काळात ती सुरक्षितता मी घेतली नाही. परंतु, या घडल्या घटनेची निवडणूक आयोग, पोलीस अधीक्षक,व गृहमंत्रालयाकडे रीतसर तक्रार दाखल मी अंगरक्षक दाखल करणार आहे. त्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती होईलच ,असेही क्षीरसागर यांनी शेवटी स्पष्ट केले.
दरम्यान,क्षीरसागर यांनी कोल्हापूरमध्ये महायुतीला मोठ्या प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून येतील. सत्ता आमचीच येईल. लाडक्या बहिणीनी भरघोस मतदान केले आहे. शहरातील पेटापेटांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. आम्हीही अनेक वर्षे राजकारण करतो. मात्र घाणेरडे नाही. आमच्याकडे विकासासंबंधी बोलण्याचे भरपूर मुद्दे आहेत. तेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो.जातीजाती भांडण आम्ही लावत नाही आणि म्हणूनच जनतेने आम्हाला स्वीकारले आहे.
मतदारांच्या माध्यमातून मतपेटीतून ते लवकरच दिसून येईल जिल्ह्यातील भाजप,राष्ट्रवादीचे तसेच आमच्या सर्व कार्यकर्ते यांनी निवडणूक पूर्वीपासूनच अधिक मेहनत घेतली आहे. त्यांच्या श्रेयाचं बहुमूल्य मत युती ला जिंकून देईल असाही शेवटी क्षीरसागर यांनी विश्वास व्यक्त केला. पत्रकार परिषदेला जयश्री जाधव महेश जाधव सत्यजित उर्फ नाना कदम, आदिल फरास,यांच्यासह युतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.