राजेश मोरे यांचा ६,६४९६ मतांनी दणदणीत विजय

 


जनतेने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आभार -नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेऊन आशीर्वाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार, मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला आशीर्वाद देताना दिलेली उमेदवारी आणि राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या लाडकी बहिण सारख्या छोट्या मोठ्या योजना लोकांच्या उपयोगी ठरल्या आहेत. या योजनावर विश्वास ठेवत आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदार संघात केलेल्या विकास कामावर विश्वास ठेऊन या जनतेने प्रचंड मोठा आशीर्वाद आपल्याला दिला आहे त्या सर्व मतदारांचे अहि कार्यकर्ते शिवसैनिकाचे आपण आभार मानतो अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे नव निर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


कल्याण ग्रामीण मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या राजेश मोरे यांना या मतदार संघातून १ लाख ४१ हजार मतदारांनी मोरे यांच्या बाजूने कौल दिल्याने मोरे यांना ६,६३९६ मताचे मताधिक्य मिळाले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विजयाची माहिती मिळताच विजयी मिरवणूक काढत आमदार राजेश मोरे यांचे अभिनंदन केले. पेंढारकर महाविद्यालयापासून काढण्यात आलेल्या रलीवर जागोजागी गुलाल आणि बुलडोझर मधून फुलाची उधळण करत कार्यकर्त्यांनी राजेश मोरे यांना शुभेच्छा दिल्या.



कार्यकर्ता घासून पुसून नव्हे ठासून जिंकून आला - खा. डॉक्टर शिंदे 

दरम्यान यावेळी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हा कल्याण ग्रामीणच्या जनतेचा विजय आहे आम्ही मागील १० वर्षे या भागात केलेल्या कामाचा विजय आहे. मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षे केलेल्या कामाचा हा विजय आहे. एक कार्यकर्ता एक घासून पुसून नव्हे तर ठासून जिंकून आला आहे. महायुतीने मागील अडीच वर्षात केलेल्या कामामुळे मोठे यश महाराष्ट्रात मिळाले आहे. जनतेने एकतर्फी विजय महायुतीला दिला आहे. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post