डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी बुधवारी तारखेला डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कलजवळील आजदेपाडा येथील आयप्पा मंदिरात दर्शन घेतले.
या मतदारसंघातील नागरीकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी जिंकून विधानसभेत जाण्याची संधी दे अशी प्रार्थना मोरे यांनी केली. त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरून नमन केले. यावेळी आजदेपाड्याचे माजी सरपंच जयंता पाटील यांनी उमेदवार मोरे यांचे स्वागत केले. येथील महिलांनी मोरे यांचे औक्षण केले. मोरे यांनी धावती भेट घेतल्याचे सांगत तुमच्या समस्या नक्की सोडविणार असे आश्वासन येथील नागरिकांना दिले.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी अमोल पाटील, बंडू पाटील, दत्ता पवार, गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे, संजय विचारे, भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, सचिन म्हात्रे आदी पदाधिकांऱ्यासह शिवसैनिक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
