Kdmc : १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज !




कल्याण: सार्वत्रिक विधानसभा निवडणूका-२०२४ अंतर्गत शनिवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या मतमोजणीसाठी १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील यंत्रणा सज्ज असल्याची माहिती १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. ही मतमोजणी डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे संपन्न होणार असून, या मतमोजणीस सकाळी ०८.०० वाजता प्रारंभ होणार असल्याचे देखील गुजर यांनी सागितले.

या मतमोजणीसाठी १५० अधिकारी व कर्मचारी तसेच १५० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही मतमोजणी १९ टेबल्सवर संपन्न होणारअसून, मतमोजणीच्या एकूण ३१+१ (PB) फेऱ्या होणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर EVM मशीन्स सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या तळ मजल्यावरील स्ट्राँगरुम मध्ये केंद्रीय निवडणूक निरीक्षक व निवडणूक प्रतिनिधी यांचेसमक्ष सिलबंद करण्यात आल्या आहेत. सदर स्ट्राँगरुम भोवती CRPF, SRPF, STATE POLICE अशी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. मतमोजणीची रंगीत तालीम शुक्रवारी डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे संपन्न झाली. 

Post a Comment

Previous Post Next Post