Maharashtra assembly elections: डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढला

 


मागील निवडणुकीपेक्षा यंदा ५६ टक्के मतदान 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात बुधवारी पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी पाहता मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसले. एकूण ५६ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मतदानाकरिता महिलाही मोठ्या संख्येने बाहेर पडल्या होत्या. मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून अतिशय शांततेच्या मार्गाने मतदानाची प्रक्रिया पार पडली.


 शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील सावित्रीबाई फुले कला मंदिर येथे मतमोजणी होणार असून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याआधीच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदान ४५ टक्याच्या पुढे गेले नव्हते. मात्र यावेळी मतदाराची वाढती संख्या आणि मतदाण करण्याकरता बाहेर पडलेल्या नागरिकांची संख्या पाहता यावेळी ५६ टक्के मतदान झाले. काही मतदारांना मतदान यादीत आपली नावे शोधण्यास उशीर होत होता. काही मतदान केंद्राबाहेर मतदारांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती तर तासभर मतदारांना उन्हात उभे राहिल्याने त्रास सहन करावा लागला. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रातील तळमजल्यावर सोय करण्यात आली होती.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ५६ टक्के मतदान 

एकूण मतदार - ३१३१२२

पुरुष -१६०२९८

महिला - १५२८२४

एकूण - ३१३१२२

-------------------

मतदानची आकडेवारी 

 महिला -  ८४०८८ ( ५५.०२ )

पुरुष - ९१८५८ ( ५७.३०)

एकूण -  १७५९४६

Post a Comment

Previous Post Next Post