Tirupati temple : तिरुपती मंदिरात राजकीय नेत्यांच्या भाषणाला बंदी



टीटीडीच अध्यक्ष बीआर नायडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या  बैठकीत निर्णय 

 तिरुपती : तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे नवीन अध्यक्ष बीआर नायडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जूनमध्ये तेलगू देसम पार्टी (टीडीपी) च्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेवर आल्यानंतर ही पहिली बैठक होती. या बैठकीत भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील दर्शनाची वेळ कमी करण्याच्या कृती आराखड्यासाठी तज्ज्ञांचे एक पॅनल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तिरुपती बालाजी मंदिरात राजकीय वक्तृत्वावर बंदी घालण्यात येणार आहे. या बैठकीत लाडू बनवण्यासाठी उत्तम दर्जाचे तूप खरेदी करणे आणि बिगर हिंदूंचे हस्तांतरण असे अनेक मोठे निर्णय यावेळी घेण्यात आले.


टीटीडीचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी सांगितले की, टीटीडीने तिरुमला येथे काम करणाऱ्या गैर-हिंदूंबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना इतर सरकारी संस्थांमध्ये पाठवले जावे किंवा स्वेच्छानिवृत्ती द्यावी अशी इच्छा टीटीडीने व्यक्त केली आहे. 


याप्रकरणी पुढे अधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिरातील सर्व कर्मचारी TTD च्या धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्यांशी सुसंगत असल्याची पुष्टी केली जाणार आहे. तसेच विशेष प्रवेश तिकीट वाटपात अनियमितता असल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी केल्यानंतर मंडळाने विविध राज्यांच्या एपी पर्यटन महामंडळाचा 'दर्शन' कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना  मंदिरात प्रार्थना केल्यानंतर विधाने किंवा भाषणे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच TTD ने खासगी बँकांमधून त्यांच्या सर्व ठेवी काढून राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा करण्याचा देखील निर्णय घेण्यात आल्याचे TTD कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post