उल्हासनगर शहरात युवा सेना बांधणीला सुरुवात



डोंबिवली ( शंकर जाधव ) :  कल्याण युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवा सेना शाखा संपर्क अभियान अंतर्गत डोंबिवली शहरानंतर उल्हासनगर शहरात मंगळवारी शिवसेना उल्हासनगर शहर मध्यवर्ती शाखेमध्ये युवा सेनेचे शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष बैठक यशस्वीपणे पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदारसंघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना शाखा संपर्क अभियान सुरुवात केली असून युवा सेना बांधणी करत असल्याचे यावेळी कल्याण युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांनी सांगितले.




सदर युवासेना बैठकीमध्ये उल्हासनगर शहर आणि विधानसभा मतदारसंघात युवा सेना बांधणीसाठी पॅनल निहाय बैठका घेण्याचे ठरले असून सदरच्या बैठकांचा कार्यक्रम नववर्षात सुरुवात करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. या बैठकीस राजेंद्र चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post