छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास नतमस्तक होऊन आमदार राजेश मोरे विधानसभेत

Maharashtra WebNews
0

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी शनिवारी विधानसभेत जाण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास वंदन केले. त्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांसमोर नतमस्तक झाले. 




यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार मोरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची किमया आहे की एक शिवसैनिक विधानसभेत जात आहे. मी माझ्या मतदार मतदार संघातील नागरिकांचेही आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)