दिव्यातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठानकडून नागरिकांना नवीन वर्षाच्या दिनदर्शिका वाटप

 



दिवा, (आरती परब) : दिव्यातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना विविध मदत करत असतात. त्यांच्या कडून दरवर्षी दिवाळीला सामाजिक उपक्रम राबविले जातात. या वर्षीही श्रीमंतयोगी प्रतिष्ठानकडून दातीवली तलाव येथे नूतन वर्षा निमित्ताने नागरिकांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्यात आले. 



दिव्यातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठान गेली नऊ वर्षे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. तर माणगांव तालुक्यातील खेडेगावातील १२ जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच मुरबाड मधील आदिवासी पाड्यात दिवाळी फराळ आणि कपडे वाटप, आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी नागरिकांची आरोग्य शिबिराद्वारे आरोग्य तापासणी केली गेली. 


 अनेक जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, आषाढी वारी निमित्त पंढरपूरला चहा, बिस्किटे देऊन वारकऱ्यांची सेवा केली जाते, असे अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था राबवत असते. दिव्यातही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम ही संस्था नेहमी घेते. आपण ही समाजाचे एक भाग आहोत, ही जाणीव ठेऊन या संस्थेतील प्रत्येक जण समाजसेवेसाठी पुढाकार घेत असतो. यात श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शशिकांत पाटील, कार्याध्यक्ष अरविंद उभारे, अध्यक्ष अजय चव्हाण, उपाध्यक्ष राहुल कानसकर, संकेश भावे, तुकाराम उंढरे, सुधाकर हर्नेकर, अनिल करकरे, दिनेश सावंत, कृष्णा चौगुले, संदीप वारंग, दत्ताराम कोशिमकर, ऋषीं सुर्वे, अरविंद घोगळे, सचिन घाणेकर, संभाजी कणसे, सुनील शिर्के, रवी शेजवळ हे सर्व सामाजिक उपक्रमात अतोनात मेहनत घेत असतात. 


या दिनदर्शिका वाटप प्रसंगी दिव्यातील माजी शिवसेना नगरसेवक दिपक जाधव आणि मानवकल्याण रुग्णालय, दिवा याचे मेडिकल डायरेक्टर डॉ. पराग जोशी आणि प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शशिकांत पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि महिला मंडळ उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post