नांदेडमधील हदगाव शहरात १८ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

 





८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

नांदेड :  हदगाव शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने हदगाव शहरात अचानक धाडी टाकून एकूण १८ तंबाखू विक्रेत्यांना ८ हजार ५००  रुपये दंड आकारण्यात आला.


ही कार्यवाही  जिल्हाधिकारी अभिजित राऊत,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे,  दंत शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र तोष्णीवाल, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक चक्रधर गुदप्पे तसेच हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्सटेबल सुरेश तुप्पेकर उपस्थित होते.


सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post