एस.एम.जी. समूहाची दुहेरी भरारी



 ‘A+’ श्रेणीसह दुबईत जागतिक सन्मान

दिवा \ आरती परब : एस.एम.जी. समूहासाठी हा महिना अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे. शासनाच्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) मूल्यांकन अहवालामध्ये एस.एम.जी. समूहातील विद्यालयाला मानांकित ‘A+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील केवळ १७ विद्यालयांमध्ये ही सर्वोच्च श्रेणी मिळाल्याचा मान आपल्या शाळेला मिळाला असून, ही कामगिरी शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.


तसेच Early Childhood Development Forum (ECDF) यांच्या वतीने Glendale International School, दुबई येथे आयोजित विशेष समारंभात एस.एम.जी. समूहाचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान समूहाच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची जागतिक स्तरावर झालेली दखल असून, संपूर्ण संस्थेसाठी गौरवाची बाब आहे.


एका महिन्यात मिळालेली ही दोन्ही मानाची पारितोषिके समूहाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ध्यासाची आणि सर्व शिक्षक- कर्मचारी यांच्या एकजुटीची पावती आहेत.


या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रति असलेले समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्टतेच्या ध्यासामुळेच हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही एस.एम.जी. समूह अशीच यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास सचिव स्वप्नील गायकर यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post