डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याणमधील सह्याद्री लोकधारा येथे राहणाऱ्या १२ वर्षीय वेदांती म्हात्रे या जलतरणपट्टूने ४ तासात १२ किमी सागरी जलतरण पार करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अनोखे अभिवादन केले.
वेदांती म्हात्रे हिची लोककल्याण पब्लिक स्कूलमध्ये सातवीत शिकते. अथांग सागर उसळणाऱ्या लाटांभरती ओहोटी च्या बदलत्या वेळा अशा कोणत्याही समस्येची पर्वा न करता वेदांतीने त्या विशाल अरबी समुद्रात उडी घेतली. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर अरबी समुद्राला आव्हान देत एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १२ किमी चे अंतर अवघ्या ४ तासात पार केले. ६ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता अंगाला ग्रीस लावून महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखखाली एलिफंटा जेटी येथून पोहण्यास सुरवात केली. आपल्या लक्षाच्या दिशेने पोहण्यास सुरवात केली.
सकाळचा थंड वारा,अंधार,सकाळची बोचरी थंडी ,वातावरण सकाळी चांगले होते.नंतर जसजसं आत समुद्रात जात होती तसे समुद्रात घान,कचरा,तेलाचा तवंग पाण्यावरून वाहत होता.समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा फटका वेदांतीला बसला. गेटवे चे ४ किमी अंतर असताना समुद्रातील मोठ्या जहाजांच्या हालचाली मुळे निर्माण झालेल्या लाटांनी वेदांतीला त्रास होत होता. प्रयत्नांची शर्त करत अखेर वेदांती ने सकाळी ९ वाजून ८ मिनिटात गेटवे ला आली.गेटवे ला आल्यावर वेदांतीचे जंगी स्वागत करण्यात आले.सर्वांनी तिचे कौतुक,अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
वेदांतीला डोंबिवलीतील यश जिमखान्यातील तरण तलावाचे प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्याकडून पोहण्याचे धडे गिरवायला मिळाले. उरण येथे दर रविवारी समुद्रात संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायची. वेदांतीचेचे पुढील लक्ष धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया व आंतरराष्ट्रीय इंग्लिश खाडी पोहून पार करायची आहे.

