एस.एम.जी. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १४ वा 'उमंग उत्सव' संपन्न



दिवा, (आरती परब) : 'ओम साई शिक्षण संस्था' संचलित, एस.एम.जी. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १४ वा उमंग उत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी, 'सेंट जाॅर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रतिभा भिंगारदिवे  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मारूती गायकर, सचिव स्वप्नील गायकर सर, व्यवस्थापक प्रणाल गायकर सर, प्रशासकीय प्रमुख अमिता गायकर  व सर्व विभागाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.


 कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रथम सरस्वतीच्या मूर्तीचे अनावरण करून प्रार्थना स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनास भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर स्वागत समारंभाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच 'उमंग उत्सव' समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये पार पडलेल्या जिल्ह्यास्तरिय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले. विद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.




प्रत्येक वर्षी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी श्रीमती साधना झुरिराम खरवार मॅडम यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्था तसेच विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक धाडवे व संस्थेचे सचिव स्वप्नील गायकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी  प्रतिभा भिंगारदिवे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post