चिपळूण, ( धनंजय काळे ) : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील मार्गतामाने एज्युकेशन सोसायटीच्या वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय व कै. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयात सांस्कृतिक परंपरेचा हा विशेष राहुटी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी वेशभूषा, देखावा सादर करून भारतीय पारंपरिक सण व सांस्कृतिक परंपरा यांचे छान दर्शन घडवून आणले. यामध्ये गणेश चतुर्थी, रामनवमी, वटपोर्णिमा, नवरात्र, दीपावली शिमगा, तसेच लोहरी, काली पूजा, छटपूजा, ओणम, पोंगल, वसंत पंचमी यांसारख्या सणांची रंगतदार झलक सादर केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जितेंद्र चव्हाण माजी सभापती पंचायत समिती चिपळूण यांच्या हस्ते व डॉ. बाळासाहेब यादव प्राचार्य डॉ.तात्यासाहेब नातू वरिष्ठ महाविद्यालय मार्गताम्हाने तसेच संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊ लकेश्री, पर्यवेक्षक विनोद पवार यांच्या हस्ते व उपाध्यक्ष जयसिंग राव मोरे, सहसचिव शशिकांत चव्हाण, खजिनदार यशवंतराव चव्हाण, सुधाकर चव्हाण, प्रताप सुर्वे, काटकर मॅडम, यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली खरात यांनी केले. परिसरातील शाळांनीही या कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसेच ताराराणी ब्रिगेड म. प्रदेश अध्यक्षा शिवमती वंदना मोरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यामध्ये पूर्वप्राथमिक १ली ते ४ च्या गटाने राहुटी गणेशोत्सव ही पारंपरिक पद्धतीने सादर केली.
पाचवी ते सातवी प्राथमिक गट प्रथम क्रमांक इयत्ता सहावी राहुटी नारळी पौर्णिमा, द्वितीय क्रमांक इयत्ता पाचवी राहूटी रामनवमी, तृतीय क्रमांक इयत्ता सातवी राहुटी वटपौर्णिमा माध्यमिक गट प्रथम क्रमांक इयत्ता नववी राहुटी दीपावली, द्वितीय क्रमांक विभागून इयत्ता आठवी नवरात्र आणि इयत्ता दहावी शिमगा यांनी प्राप्त केला. उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक अकरावी कॉमर्सच्या छटपूजा बिहार या राहुटीला, द्वितीय क्रमांक बारावी सायन्सच्या काली पूजा पश्चिम बंगाल, तृतीय क्रमांक बारावी कॉमर्स ओणम केरळ यानी प्राप्त केला. तर उत्तेजनार्थ म्हणून अकरावी आर्ट्सच्या लोहरी पंजाब, अकरावी सायन्स पोंगल तामिळनाडू व बारावी आर्ट्सच्या वसंत पंचमी हरियाणा यांनी प्राप्त केला. या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून धनावडे सर, राष्ट्रपाल सावंत सर, नेहा सोमण, मेघना चितळे यांनी काम पाहिले.