डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील फुटपाथ फेरीवालामुक्त

 


सहाय्यक आयुक्त कुमावत यांचे नागरिकांनी मानले आभार 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करण्याकरता पालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. पालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार उपायुक्त तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी  पालिकेच्या 'ग' प्रभाग क्षेत्र कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. 



पोलीस बंदोबस्तात झालेल्या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने दुकानदारांनी लावलेल्या अनधिकृत शेड तोडण्यात आले.फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने सहाय्यक आयुक्त कुमावत यांनी येथील समानही जप्त केले. फुटपाथ हा नागरिकांसाठी आहे, नागरिकांना फुटपाथवरून व्यवस्थित चालतात यायला हवे, पुन्हा फुथपाथवर अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करू असा इशाराही कुमावत यांनी येथील दुकानदारांना दिला. कारवाई पाहून नागरिकांनी कुमावत यांचे आभार मानले.




Post a Comment

Previous Post Next Post