कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणार

 


मदार राजेश क्षीरसागर यांचे प्रतिपादन 

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवतवसेनेने घवघवीत यश संपादन केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांच्या विचारधारेनुसार शिवसेनेचे शिलेदार सातत्याने काम करत असून, या कार्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे. त्यमुळे नॅचरल जस्टीसनुसार शिवसेनेचाच महापौर होणार आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले.


शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे, शिवसेनाप्रमुख अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.


यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, महाराष्ट्रात केवळ कोल्हापुरातच महायुती म्हणून निवडणूक लढविण्यात आली. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती घडविण्यासाठी प्रयत्न झाले. कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेने जागावाटपात एक पाऊल मागे घेतले. या त्यागाचा मोबदला म्हणून महापौर पद शिवसेनेला मिळणे हा आमचा नैसर्गिक हक्क आहे.


महायुतीकडे ४६ चे संख्याबळ असून ते सत्तास्थापनेसाठी पुरेसे आहे. त्यामुळे महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण होणार नाही. मागील काही वर्षांतील महापालिकेतील पदवाटपाचा लेखाजोखा करून सर्व पक्षांना न्याय मिळेल, अशा पद्धतीने पदांचे वाटप केले जाईल. स्वीकृत नगरसेवकांची निवड कायद्याच्या चौकटीत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


देशात, राज्यात आणि महापालिकेत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. शहरातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील. नागरिकांना सेवा देण्यात शिवसेना व महायुतीचे नगरसेवक कमी पडणार नाहीत. सुसज्ज, आधुनिक आणि विकासाभिमुख कोल्हापूर घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.


यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, ऋतुराज क्षीरसागर, अजय इंगवले, आस्कीन आजरेकर, सत्यजित जाधव, वैभव माने, स्वरूप कदम, अभिजित खतकर, तसेच नगरसेविका मंगल साळोखे, अर्चना पागर, प्राजक्ता जाधव, शिला सोनुले, अनुराधा खेडकर, संगीता सावंत, कौसर बागवान, शहरप्रमुख रणजीत जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post