उल्हासनगर : नागरी संरक्षण संघटनेचा ६२ वा वर्धापन सप्ताह ठाणे नवी मुंबई परिसरात रॅली, जनजागृती कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक सारखे विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. याची सांगता उल्हासनगर येथील गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन च्या कार्यालयात परिसरातील नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सहाय्यक उपनियंत्रक आननसिंग गढरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप तसेच वर्धापन सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबीर आयोजित करून करण्यात आली. या रक्तदान शिबिरात ८० युनिटपेक्षा जास्त रक्तसंकलन झाले. तसेच संघटनेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवक व अधिकार्यांना शाल व सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात भारत गंगोत्री साहेब , सोनिया धामी ( अध्यक्ष गंगोत्री फाऊंडेशन ) तसेच नागरी संरक्षण संघटनेचे विभागीय क्षेत्ररक्षक सुनील टेकचंदानी यांनी पुढाकार घेऊन जातीने लक्ष घालून कार्यक्रम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा होता. या समारोप समारंभास नागरी संरक्षण नवी मुंबई समूह-ठाण्याचे उपनियंत्रक विजय जाधव ( डिश अवॉर्डने सन्मानित ) , उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र- ३ कमलेश श्रीवास्तव ( डिश अवॉर्ड सन्मानित ), उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र-१ बिमल नथवाणी ( राष्ट्रपती पदक सन्मानित ) तसेच उल्हासनगर अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे , उपमुख्य अग्निशमन अधिकारी पंकज पवार यांच्यासह नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक दिपा घरत कल्याण पश्चिम विभागीय क्षेत्ररक्षक शकुंतला राय ( डिश अवॉर्ड सन्मानित), मानपाडा विभाग- विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी , अंबरनाथ विभाग-विभागीय क्षेत्ररक्षक संजय मगर आणि मानसेवी निदेशक प्रकाश ठमके ( डिश अवॉर्ड सन्मानित ) हे सर्व उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशन चे भारत गंगोत्री साहेब साहेब यांनी सदर कोर्स चे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि सध्याची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त नागरिकांनी हे नागरी संरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असून अशा प्रकारच्या कोर्सचे आयोजन करण्यास नेहमीच सर्व प्रकारे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित नागरी संरक्षण अधिकारी यांचा वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट बचाव कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा सोनिया धामी यांनी उल्हासनगर हे शहर दाटीवाटीच्या इमारतीमुळे एक आपत्ती प्रवण शहर झालेले आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी नागरी संरक्षण संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यातील प्रगत अभ्यासक्रमासाठी देखील जास्तीत जास्त प्रोत्साहन देवून आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. व नागरी संरक्षणच्या संपूर्ण टीमचे आणि विशेषतः सुनील टेक चंदानी यांचे या कोर्स व रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले.



