अलिबागमध्ये उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना स्थापन





आमदार महेंद्रशेठ दळवी तसेच नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या शुभहस्ते उदघाटन 


अलिबाग ( धनंजय कवठेकर ) : अलिबाग - मुरूडचे आमदार महेंद्रशेठ दळवी तसेच अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या शुभहस्ते नुकतेच पिंपळभाट येथे उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखान्याचे उदघाटन फित कापून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तसेच धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 




उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेअंतर्गत ही आरोग्यसेवा चालू करण्यात आली आहे. ही आरोग्य सेवा दिवसाचे २४ तास पुरवण्यात येणार असून येथे २४ तास रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध आहे. तसेच ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य माणूस मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा मोठ्या हॉस्पिटलला जाण्याची गरज नसते अशा मेडिकल इमर्जन्सीमध्ये रुग्णांना योग्य प्रकारे औषधीय सेवा पुरवण्याची व्यवस्था सदरील या दवाखान्यामध्ये देण्यात येणार आहेत. यामध्ये खूप विकनेस आलेल्या रुग्णास एखाद दोन सलाईन ची गरज असते किंवा काही जणांना कोर्सची इंजेक्शन घेण्याचे असते, 




आजच्या महागाईच्या काळात अल्प दरामध्ये ही सेवा ह्या संस्थेमार्फत पुरवण्यात येणार आहे तसेच काही वेळा घरातील वृद्ध आजारी व्यक्ती एक दोन दिवसांसाठी घरातील कर्त्या पुरुषास व्यवस्था करावयाची असते परंतु अशी व्यवस्था नसल्यामुळे त्यांची अडचण होते, ती दूर करण्याची उज्ज्वल संस्था प्रयत्न करत आहे. तसेच काही वेळा आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी दरवेळी छोट्या छोट्या कारणांसाठी हॉस्पिटलला नेणे शक्य नसते तेथे नर्सिंगची सुविधा आमच्या संस्थेमार्फत घरपोच पुरवण्यात येणार आहे. वरील सर्व सेवा अत्यंत माफक दरामध्ये ह्या संस्थेमार्फत पुरवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 





उद्घाटनप्रसंगी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान, जन शिक्षण संस्थान अध्यक्ष डॉ नितीन गांधी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ राहुल शर्मा, ॲड. विकास पाटील, तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जिविता पाटील, जिजाई लॅब मनीष माळी, धर्मराज प्रतिष्ठानचे सचिन चव्हाण, उज्ज्वल भविष्य सदस्य संदेश चव्हाण, रोशन पंडित, ॲड. अमर घरत, प्रिन्स ज्वेलर्स सोनी, पत्रकार नितीन वाडेकर, डॉ. काशिनाथ स्वामी, डॉ. आनंद पाटील, मेडिकल मनोहर पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सर्व पदाधिकारी यांचे या स्तुत्य उपक्रमासाठी कौतुक केले तसेच गरीब व गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. 



 अलिबागचा चेहरा मोहरा बदलविणारे सर्वांचे लाडके नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांनी उज्ज्वल भविष्य संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत अशा समाजपयोगी स्तुत्य उपक्रमास भविष्यात लागेल ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी यावेळी संस्थेच्या अंतर्गत माणुसकी प्रतिष्ठान, तेजस्विनी फाउंडेशन तसेच जन शिक्षण संस्थेच्या सहकार्याने खेडोपाडी आरोग्य शिबिर राबविणे, महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देणे, वृद्धांना सेवा देणे, समुपदेशन करणे, इ.उपक्रम गेली ४ वर्षे राबवीत. असल्याचे सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post