मुंब्रा पोलीस ठाण्यात दत्त जयंती उत्साहात साजरी

Maharashtra WebNews
0


दिवा, (आरती परब) :   मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आवारात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या शुभमुहूर्तावर भगवान दत्ताचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होती.

ठाणे शहरातील चेंदणी कोळीवाडा येथील पुरातन मंदिरात पहाटेपासूनच दर्शन व पूजेची प्रक्रिया सुरू होऊन ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मंदिरात रांगेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी पहाटेच मंदिरात पोहोचून  दत्तात्रयाची पूजा केली. 

तसेच कळव्यातील मुख्य मार्गावरील मनीषा नगरजवळ असलेल्या मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून आली. कौसा खरी मशिन मार्गावर असलेल्या मंदिरात आजूबाजूच्या भाविकांनी दत्तात्रयाची पूजा केली.  मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजेनिमित्त मुंब्रा पोलीस ठाण्यात आयोजित भंडाऱ्यात भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)