दिवा, (आरती परब ) : सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या ग्राहकाला ते योग्य शुद्धतेमध्ये मिळण्यासाठी दिव्यातील दिवा ज्वेलर्स असोसिएशनची अर्ध्या दिवसाच्या बैठकीचे आयोजन बीआयएस, मुंबई शाखा कार्यालय २ यांच्या द्वारे केले होते. या कार्यक्रमात दिवा परिसरातील ८० ज्वेलर्सचे मालक उपस्थित होते.
बीआयएस प्रमाणपत्र, हॉलमार्किंग आणि बीआयएस केअर ॲप्लिकेशनबद्दल जागरुकता वाढवणे हा ज्वेलर्स जागृती कार्यक्रमा मागचा मुख्य उद्देश होता. अनुराग Sc.C आणि नरेश हरड (हॉलमार्किंग रीप्रेझेंटीव्ह) यांनी सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि ग्राहकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी बीआयएस मानकांच्या महत्त्वावर चर्चा केली. उच्च- गुणवत्तेचा दर्जा राखण्यात ज्वेलर्सच्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.
अनुराग यांनी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) प्रणालीचे विहंगावलोकन दिले. BIS CARE ॲप वापरून दागिन्यांवर HUID क्रमांक कसे तपासायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले. तर त्यावेळी कार्यक्रमातील सहभागींना बीआयएस हॉलमार्किंग योजनेची माहिती देण्यात आली, ज्यात त्याचे महत्त्व आणि अनुपालनासाठीच्या प्रक्रियेचा समावेश आहे. हॉलमार्क आणि HUID तपशील तपासण्यासाठी BIS CARE ॲपच्या वापराचे तपशीलवार वर्णन करण्यात आले.
या कार्यक्रमात शुद्ध सोन्याचे दागिने कसे तपासायचे याचे तपशीलवार संवादात्मक सत्रात सहभागींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अनुराग यांनी दिली. अयशस्वी नमुन्यांची जबाबदारी ही ज्वेलर्सची असल्याचे तेथे सांगितले गेले. तर चाचणीपूर्वी दागिन्यांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ज्वेलर्स जबाबदार असे स्पष्ट केले. ट्रेसिबिलिटीसाठी नोंदी ठेवण्याच्या महत्त्व यावर भर दिला. सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्क टेस्ट करताना ते नमुने सतत अयशस्वी झाल्यास ज्वेलर्सकडून सोन्यामध्ये सुधारात्मक कारवाई आवश्यक असल्याचे त्यावेळी अनुराग यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दिवा व्यापारी संघटनेचे चेतन पाटील आणि दिवा ज्वेलर्स असोसिएशन (ठाणे) उपाध्यक्ष हरी सिंग यांनीही काही चर्चा केल्यानंतर हा परिसंवाद समाप्त करण्यात आला.