रस्ता रुंदीकरणात बाधित ठरणाऱ्या इमारतींवर पालिकेची धडक कारवाई



कल्याण, ( शंकर जाधव) : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड व अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे निर्देशानुसार, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांचे मार्गदर्शनाखाली १०/ई प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी डोंबिवली (पूर्व) येथील स्टार कॉलनी ते समर्थ चौक या २४.०० मी. रस्ता रुंदीकरणात बाधित  होत असलेल्या ओम रेसिडेन्सी  या तळ + ४ मजली इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई काल सुरु केली. सदर इमारतीमध्ये १६ सदनिका धारक व ६ गाळेधारकांना नोटीसा देवून इमारत रिकामी करण्यात आली होती.


ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कामगार, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आणि हाय जॉ क्रश मशीन, ,१ पोकलेन व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे. सदर कारवाई आजही सुरू राहणार असल्याची माहिती १०/ई प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी दिली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post