दिवा, (आरती परब) : दिवा शहरातील स्मार्ट एज्युकेशन या शाळेत ५ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग एका विकृत व्यक्तीकडून वर्गात घुसून करण्यात आला. हा प्रकार मंगळवारी शाळेच्या वर्गात घडल्यानंतर शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण पालकांनी मुंब्रा पोलीस स्टेशनला याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
पण शाळेच्या विरोधात कुठलीही कारवाई पोलिसांनी न केल्याने दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेवून शाळेच्या संस्था चालकां विरोधात आणि मुख्याध्यापकां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. अखेर मुख्याध्यापिका संगीता मनीष तिवारीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी उपस्थित मनसे पदाधिकारी शहर सचिव प्रशांत गावडे, मनवीसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील, विभाग सचिव परेश पाटील, शाखाध्यक्ष सागर निकम, नम्रता खराडे उपस्थित होते.