Bitcoin Growth : बिटकॉइनच्या किमतीत विक्रमी वाढ

Maharashtra WebNews
0



गुरुवारी, बिटकॉइनची किंमत ५.९ टक्क्यांनी वाढून प्रति बिटकॉइन $ १,०१,४३८.९ च्या पातळीवर पोहोचली 


 वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे, गुंतवणूकदार क्रिप्टो चलनात गुंतवणूक करण्याबाबत पुढाकार घेत असल्यामुळेच बिटकॉइनच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बिटकॉइनची किंमत एक लाख डॉलरच्या पुढे गेली आहे.  गुरुवारी, बिटकॉइनची किंमत ५.९ टक्क्यांनी वाढली आणि प्रति बिटकॉइन $ १,०१,४३८.९ च्या पातळीवर पोहोचली आहे.  


डोनाल्ड ट्रम्प हे क्रिप्टो करन्सीचे समर्थक मानले जातात. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना आशा आहे की ट्रम्प सरकारच्या अंतर्गत क्रिप्टोसाठी एक चांगले नियामक वातावरण तयार केले जाऊ शकते. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी पॉल ऍटकिन्स यांना त्यांच्या सरकारमध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲटकिन्स हा क्रिप्टो चलनाचा मोठा समर्थक मानला जातो. पॉल ऍटकिन्सच्या नियुक्तीमुळे क्रिप्टो बाजार उत्साहित होण्याचे हे देखील एक कारण आहे आणि गुंतवणूकदारांना आशा आहे की अमेरिकेतील क्रिप्टो चलनाशी संबंधित नियमन सुलभ आणि चांगले केले जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 



खुद्द ट्रम्प यांना क्रिप्टो करन्सीमध्ये रस आहे. या वर्षाच्या सुरुवातीला यूएसमध्ये बिटकॉइन एक्सचेंज ट्रेडेड फंड मंजूर झाल्यानंतरही, बिटकॉइनच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. यूएस निवडणुकीपासून या बिटकॉइन एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये सुमारे चार अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे.  


बिटकॉइनच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. हे क्रिप्टो चलन आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम कमाई देत आहे. त्यामुळे बिटकॉईनची मागणी वाढत आहे. येत्या काही दिवसांत बिटकॉइन आणखी वाढण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनीही बिटकॉइनची सोन्याशी तुलना केल्याने बिटकॉइनची मागणीही वाढली आहे. नोव्हेंबर २०२४ पासून बिटकॉइनची किंमत जवळपास १४०% वाढली आहे.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)