डोंबिवली ( शंकर जाधव) : शालेय शिक्षण घेत असताना आपल्यातील कलागुणांना वाव देत व्यासपीठ मिळण्यास विद्यार्थी आपल्या आई - वडिल, गुरूंचे, शाळेच नव्हे तर शहर, गावाचे नाव राज्यपातळीवर, देशपातळीवर उंचावितात. १४ गावातील पिंपरी गावात १९ तारखेला पार पडलेल्या ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत दहिसर केंद्र स्तरीय शालेय विविध गुणदर्शन स्पर्धेतील वक्तृत्व स्पर्धेत बामल्ली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या पाचवीतील सांज ( काव्या ) संजय भोईर हिने प्रथम क्रमांक पटकविला.
सांज (काव्या ) हिचे ठाणे जिल्ह्यात कौतुक होत असून आपल्या गावाचे नाव मोठे केल्याबद्दल गावात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
