Bollywood movie : अनिल शर्मा यांचा 'वनवास' २० डिसेंबरला चित्रपटगृहात

Maharashtra WebNews
0

 


अपने', 'गदर: एक प्रेम कथा' आणि 'गदर २' सारख्या चित्रपटांचे निर्माते अनिल शर्मा यांचा नवा चित्रपट वनवासचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा बनारस, नाते, भावना आणि प्रेम याभोवती फिरत असल्याचे पहावयास मिळत आहे.  या चित्रपटात  नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा यांची जोडी दिसणार आहे. 'वनवास' हा चित्रपट २० डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


ट्रेलरच्या सुरुवातीला बनारसचे रंग, मजा आणि बिनधास्तपणा दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये उत्कर्ष शर्मा घाटाच्या काठावर नाचताना दिसतो. दोन मिनिट ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्यासह इतर स्टार्सही अभिनयात मग्न झालेले दिसले.





'वनवास'चा ट्रेलर आऊट झाल्यानंतर, अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, “हा चित्रपट आपण स्वतःमध्ये दडपलेल्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ही व्यक्तिरेखा साकारणे म्हणजे कुटुंब, आदर आणि आपलेपणा या माझ्या स्वतःच्या समजुतीचे भाव उलगडण्यासारखे होते. “हा एक असा चित्रपट आहे ज्याच्याशी प्रेक्षक जोडले जातील. खरं तर, ‘वनवास’ हा भावनिक रोलरकोस्टर आहे, जो नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा वेध घेतो. हा चित्रपट कौटुंबिक अर्थाची व्याख्या करतो आणि खरे बंध रक्ताने नसून प्रेमाने बनतात, यावरही भर देतो.”




'अपने', 'गदर: एक प्रेम कथा' आणि 'गदर २' सारख्या चित्रपटांचे निर्माते अनिल शर्मा म्हणाले, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. ‘वनवास’ मध्ये प्रेम, त्याग आणि कुटुंबाचा खरा अर्थ काय हे सांगितले आहे. नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, राजपाल यादव स्टारर असून 'वनवास' हा चित्रपट २० डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 



 गेल्या महिन्यात, 'वनवास'च्या निर्मात्यांनी हृदयस्पर्शी भावनांच्या महासागरात डुबकी मारणारे 'बंधन' हे गाणे रिलीज झाले होते. 'बंधन' हे गाणे विशाल मिश्रा, पलक मुच्छाल आणि मिथुन यांनी गायले आहे. मिथुनने संगीतबद्ध केले असून त्याचे बोल सईद कादरी यांनी लिहिले आहेत.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)