Pv Sindhu : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लग्नाच्या बंधनात अडकणार

Maharashtra WebNews
0




हैदराबाद : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. पीव्ही सिंधूने नुकताच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महिला एकेरी ट्रॉफी जिंकून दोन वर्षांहून अधिक काळ टिकलेल्या विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. 


२९ वर्षीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबद्ध होणार आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू हैदराबादचे रहिवासी व्यंकट दत्ता साई यांच्याशी लग्न करणार आहेत, जे पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. याबाबत सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी याला दुजोरा दिला.


मिळालेेल्या माहितीनुसार,  २० डिसेंबरपासून लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. लग्नाच्या तारखा अशा प्रकारे निश्चित करण्यात आल्या आहेत की पीव्ही सिंधू जानेवारीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सर्किटवर पुनरागमन करू शकते. सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी सांगितले की दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होते पण एक महिन्यापूर्वीच सर्व काही ठरले होते. ही एकमेव वेळ होती कारण जानेवारीपासून तिचे (सिंधूचे) वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे.


 उल्लेखनीय आहे की पीव्ही सिंधूने रविवारी चीनच्या लुओ युवुचा २१-१४, २१-१६ असा पराभव करून सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. पीव्ही सिंधूने २०१७ आणि २०२२ मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपदही जिंकले आहे. पीव्ही सिंधूची या वर्षी १४ स्पर्धांमध्ये ही दुसरी वेळ होती जेव्हा अंतिम फेरी गाठण्यात यश आले. यापूर्वी तिला मलेशिया मास्टर्समध्ये चीनच्या वांगकडून पराभव पत्करावा लागला होता. जुलै २०२२ मध्ये सिंगापूर ओपनमध्ये भारतीय शटलरचे शेवटचे विजेतेपद होते.


 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)