Navi mumbai : अनधिकृत बांधकामाविरोधात कोपरखैरणे विभागात कारवाई


नवी मुंबई :  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटीसची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.


  नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत श्री.साहेबराव एस सणस, SS टाईप,रूम नं ९४१, सेक्टर-३, कोपरखैरणे, नवी मुंबई, यांच्या बांधकामास नोटीस बजावण्यात आली होती.  सदर बांधकामावर  तोडक कार्यवाही करण्यात आली. सदर बांधकाम धारकांकडून रु.१०,०००/- दंड वसूल करण्यात आला.


    तसेच, कोपरखैरणे विभागातील फेरीवाला व  दुकानांवर मार्जिनल स्पेस कारवाई करण्यात आली व एकूण १२५००/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. कोपरखैरणे विभागातील सेक्टर ९ येथील एकूण ९ झोपड्या हटविण्यात आल्या. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी नमुंमपा पोलीस बंदोबस्त होता. तसेच ८ मजूर, ०२ इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर ०१,पिकअप व्हॅन ०१ कारवाई करीता वापर करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post