भारतीय UPSC प्रशिक्षक अवध ओझा यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

Maharashtra WebNews
0

 



नवी दिल्ली : सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि प्रेरक वक्ते अवध ओझा यांनी सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.  त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. अवध ओझा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 



 दिल्लीच्या शैक्षणिक क्रांतीमुळे प्रभावित झालेले, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज अवध ओझा यांना आम आदमी पार्टीच्या कुटुंबाचा एक भाग होण्याचा निर्णय घेतला आहे.  आम आदमी पक्षात प्रवेश करताना अवध ओझा म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी मला राजकारणात येण्याची आणि शिक्षणासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शिक्षण हे कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा आत्मा आहे. ते पुढे म्हणाले की, आज माझ्या राजकीय डावाच्या सुरुवातीला मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, जर मला राजकारण आणि शिक्षण यातील निवड करायची असेल तर मी शिक्षणाची निवड नक्कीच करेन. राजकारणात येऊन शिक्षणाचा विकास हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले. 



आम आदमी पक्षात प्रवेश करताच त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची माहिती समोर आली आहे.  दुसरीकडे, अवध ओझा यांना पक्षात घेतल्याने फायदा होईल, अशी आम आदमी पार्टीला आशा आहे. कारण ओझा यांची सोशल मीडियावर आणि तरुणांमध्ये चांगली लोकप्रियता आहे. अनेकवेळा अवध ओझा यांनी आपचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही कौतुक केले आहे. 



 पुढील वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्ली निवडणुकीसंदर्भात आम आदमी पार्टी निवडणूक कार्यक्रमात व्यस्त आहे. अशा स्थितीत यावेळी पक्ष अनेक आमदारांची तिकिटे रद्द करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.  अवध ओझा हे देखील देशातील सर्वाधिक पसंतीचे शिक्षक आहेत. ओझा हे भारतीय UPSC प्रशिक्षक, YouTuber आणि शिक्षक आहेत. ते यूपीच्या गोंडा जिल्ह्यातील रहीवासी आहे. यूपीएससी परीक्षेत निराश झाल्यानंतर अलाहाबादमध्ये कोचिंग शिकवायला सुरुवात केली. कोविडमुळे ऑफलाइन क्लासेस बंद झाले, तेव्हा त्याच्या वेगळ्या शिकवण्याच्या शैलीमुळे तो यूट्यूबवर पटकन लोकप्रिय झाले. 



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)