डोंबिवलीतील विद्यार्थ्यांची पोलीस कार्यालयास भेट

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :    डोंबिवली पोलीस स्टेशन तर्फे आयोजित 'पोलीस रेझिंग डे' पोलीस व जनता सुसंवाद' या कार्यक्रमांतर्गत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेतील पाचवी ते सातवीच्या वर्गातील निवडक ६० विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका मुणगेकर , सहकारी शिक्षक  तळवणेकर, मोरे तसेच  राठोड, पालक प्रतिनिधी लोंढे यांनी पोलीस कार्यालयास भेट दिली.


   विद्यार्थ्यांना पोलीस कार्यालयातील विविध कक्ष व तेथील कामकाजाबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली. तसेच विविध प्रकारच्या रायफल्स कोणत्या प्रसंगी वापरल्या जातात याबद्दल सविस्तर माहिती  पोलिस अधिकारी प्रमिला कावळे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले जसे की सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे काय? सायबर क्राईम म्हणजे काय? पोलीस पदापर्यंत पोहोचण्यासाठी कोणती पात्रता  आवश्यक असते? पोलिसांच्या कामाचे तास किती असतात? पोलीस स्वतःचा ताण तणाव दूर करण्यासाठी कोणते उपाय करतात? इत्यादी प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना विचारले. वरिष्ठ सहाय्यक निरीक्षक प्रमिला कावळे, बापूराव जाधव, गणेश गीते यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. नंतर विद्यार्थ्यांनी पोलीस कार्यालयातील बिनतारी संदेश कक्ष, पोलीस कोठडी, सीसीटीव्ही यंत्रणा कक्ष हे जवळून बघितले.


पोलीस कार्यालयास दिलेल्या या भेटीमुळे तसेच प्रत्यक्ष पोलिसांशी साधलेल्या संवादामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयी भीती कमी होऊन आदराची भावना वृद्धिंगत झाली व विविध बंदुका रायफल स्वतः हातात  घेण्याचा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. तेथील अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स भेट म्हणून दिल्या संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले. आले.




Post a Comment

Previous Post Next Post