दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध : रोहिदास मुंडे
दिवा, (आरती परब) : दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी दिवाळी नंतर समितीचा पदभार हातात घेतल्यावर त्या भागात सुरू असणारी अनधिकृत बांधकामे व फेरीवाले यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने कारवाया चालू केल्या होत्या. त्यातच काल एका अनधिकृत बांधकामावर कारवाई दरम्यान आयुक्तांवर दोघांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा उबाठा गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे.
दिव्यावर अनधिकृत बांधकामांचा ठप्पा लागलेला असून तो ठप्पा काढण्यासाठी येणारे प्रत्येक सहाय्यक आयुक्त प्रयत्न करत असतात. पण या अशा बऱ्याच कारवाई दरम्यान त्यांना नागरिकांच्या रोशाला, नाराजीला सामोरे जावे लागते. त्यातच काल शीळफाटा येथे एका इमारतीवर कारवाई करत असताना बिल्डराकडून त्यांच्यावरती भ्याड हल्ला करण्यात आला. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने ते व्यवस्थित आहेत, परंतु अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांकडून व महापालिकडून कठोर कारवाई झाली पाहिजे. दिवा प्रभाग समिती अंतर्गत चालू असणाऱ्या अनधिकृत बांधकाम व फेरीवाले यांच्यावर कठोर कारवाई झाली होऊन अनधिकृत बांधकाम व अनाधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे. या भ्याड हल्ला करणाऱ्यांचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
.jpg)