Diva news : कोकण प्रतिष्ठानचा १० वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न



दिवा, (आरती परब) : दिवा शहरातील कोकणी बांधवांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव राजकारण विरहित संघटना म्हणून कोकण प्रतिष्ठान ही शहरात कार्यरत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संघटनेचा वर्धापनदिन आणि दिनदर्शिका प्रकाशन, वितरण समारंभ संघटनेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.


दिव्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कोकण प्रतिष्ठान आणि आर. के. आर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यातील मुलांसाठी माफक दरात चित्रकलेचे क्लास सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी कोकण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाला दिव्यातील कोकणी बांधव मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post