पशुसंवर्धनच्या आवारात खासगी पार्किंग

 



कारवाई करण्यावर अधिकाऱ्यांचे मौन 


अलिबाग (धनंजय कवठेकर) : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या रामनाथ येथील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात सुट्टीच्या दिवशी खासगी सोहळ्यादरम्यान बिनधोकपणे पार्किंग करण्यात आले होते. विशेष म्हणजे कार्यालयाच्या मुख्य दरवाजावर पार्किंग असा फलक लावून जागा आपलीच असा दिमाख आयोजकांनी आणला होता. याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. याबाबत कोणतीच कल्पना कार्यलायाला नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. खासगी आयोजकांवर कारवाई करण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे दिमाखात सांगत आपले हात झटकले. 


अलिबाग शहरातील रामनाथ परिसरात शासनाचे पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय आहे. कार्यालयासमोर प्रशस्त जागा आहे. तास या कार्यालयाच्या समोरील रास्ता रहदारीचा आहे. यामुळे त्या परिसरात पार्किंग करणे खासगी वाहनांसाठी अडचणीचे ठरते. असेअसलेतरी अशावेळी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात पार्किंग करणे सर्वसामान्यांना अडचणीचे ठरते. असे असतानादेखील सुट्टीच्या दिवशी कार्यालयाच्या परिसरात जाण्यासाठी असणाऱ्या मुख्य दरवाजा उघडून त्या आवारात पार्किंग करण्यात आली होती. विशेष म्हणजे कार्यलय बंद आणि खासगी पार्किंगसाठी मुख्य दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. आयोजकांनी तर कहरच केला होता कार्यालयाच्या मुख्य दरवाजावर पार्किंगचा फलक लावून सदरील जागा आपलीच आसा तोरा मिरवला होता. 



याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी थेट संपर्क केला. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी अशी पार्किंग या आवारात झाली होती यावर नकार दिला . याबाबतचे पुरावे असल्याचे सांगितल्यावर त्यांनी असे घडले असल्याबाबची माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. शासकीय जागेत खासगी आयोजकांनी पार्किंगसाठी परवानगी मागितली होती किंवा आपण अशी परवानगी देतो का असे विचारल्यावर अधिकाऱ्यांनी शासकीय जागेत पार्किंग करण्यासाठी परवानगी देता येत नाही असे सांगितले यावर खासगी आयोजकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करणार का असे विचारल्यावर अधिकाऱ्यांनी मौन बाळगले.


Post a Comment

Previous Post Next Post