ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनदर्शिकाचे प्रकाशन

 



खेड तालुका कोकण रहिवासी मंच, दिवा शहरचा उपक्रम 


दिवा,  (आरती परब) :  कोकण विकास मंचचे (कोकण बाजार) सचिव, तसेच जनआक्रोश मोर्चाचे सदस्य विकास निकम व कुणबी रहिवासी संघटना दापोलीचे सदस्य सुनील चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, तसेच संत रोहिदास महाराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक खोपकर आणि माजी विध्यार्थी संघटना कुळवंडी हायस्कूलचे सेक्रेटरी निलेश निकम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, संघटनेचे अध्यक्ष सतीश निकम, सल्लागार शरद शिबे, कमिटी सदस्य नरेश शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी कुळवंडी हायस्कूलचे माजी विद्यार्थी उतेकर, संस्थेचे सभासद विकास पवार यांनी सुद्धा सावित्रीबाईंच्या चरणी पुष्प अर्पण केले. नंतर आलेल्या मान्यवरांचा सन्मान करून, सर्वांच्या हस्ते नव वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. 


संघटनेचे प्रवक्ता प्रवीण उत्तेकर यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरती दोन शब्द व्यक्त करून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. आजच्या कार्यक्रमाला संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष खोत, अध्यक्ष सतीश निकम, सहखजिनदार हरेश लाड, सह संपर्क प्रमुख अशोक कदम, कमिटी सदस्य चोरगे, आशिष बुरटे, विशाल निकम यांनी सुद्धा सावित्रीबाईंच्या प्रतिमेस आरती ओवाळून पुष्प अर्पण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी निलेश पाटणे यांनी केले. त्यानंतर सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post