महिलांच्या हक्काचा शिधा जातोय कुठेय? - महिलांचा आरोप
डोंबिवली ( शंकर जाधव ) : महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र लाडक्या बहिणींचा हक्काचा शिधा जातोय कुठे असा संतप्त प्रश्न डोंबिवलीतील २०० कुटुंबियांना उपस्थित केला आहे.डोंबिवलीतील क्रांतीनगर झोपडपट्टी मधील राहिवाशांनी थेट सरकारवर नाराजी व्यक्त करत आपले लाडक्या बहिणींना शिधा न देणारे हे कसलं सरकार असा थेट जाबच विचारला आहे.गुरुवारी तारखेला येथील राहिवाशांनी यासंदर्भात बैठक घेतली.शुक्रवारी रहिवाशांनी डोंबिवली पूर्वकडील शिधावाटप कार्यालयात अधिकारी दीपक डोळस यांची भेट घेऊन निवेदन दिले.
डोंबिवली पूर्वेकडील टंडन रोडरील क्रांतीनगर झोपडपट्टीमध्ये गुरुवारी मच्छिंद्र तांदळे यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी महिलांनी रेशनिंग कार्डवर प्रत्येकाला शासनाननुसार मिळणाऱ्या हक्काचा शिधात तफावत असून प्रत्येकी ५ किलो शिधा न देता ४ किलो शिधा दिला जात असून आम्हाला हक्काचा शिधा हे सरकार का देत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. शिधावाटप (रेशनिंग) दुकान क्रमांक ३९ फ १६७ क ९०७ संगितावाडी डोंबिवली पूर्व येथे गेल्या काही वर्षापासून आमची फसवणूक करून आमचे हक्काचे धान्य का देत नाही.आम्ही महिलांनी रेशनिंग दुकानदारला विचारणा केली असता दुकानदार आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत आहे.
अंत्योदय अन्न योजना अंतर्गत गोरगरिबांना देण्यात येणारे धान्य नाही देणार अशा पद्धतीने अरे रावीची भाषा दुकानदार आम्हा गरीब लोकांवर करीत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून आम्हाला प्रत्येकाला व्यक्तीला ५ किलो धान्य आहे.सदर दुकानदार आम्हाला ४ किलो धान्य देत आहे. व दिलेल्या धान्यची कोणतेही पोच पावती देत नाही. एका घरात अंदाजे ४ सदस्यांची संख्या आहे. २००x४ = ८०० सदस्यांची संख्या व ८०० किलो धान्याची दुकानदार चोरी करत आहे असा आरोप येथील राहिवाशांनी केला आहे. या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व क्रांती नगर रहिवाशी यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळवून द्यावे. येत्या २७ जानेवारी २०२५ पर्यंत आमचे हक्काचे धान्य व दिलेल्या धान्याची पोच पावती मिळाले नाही तर २८ जानेवारी रोजी आपल्या कार्यालयात वर" जन आंदोलन" करू असा इशारा येथील राहिवाशांनी डोंबिवली पूर्वेकडील शिधावाटप कार्यालय प्रमुख डोळस व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली (रामनगर)व कल्याण तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
याबाबत शिधावाटप कार्यालय प्रमुख डोळस यांना विचारले असता ते म्हणाले, क्रांतीनगर झोपडपट्टीतील राहिवाशांचे निवेदन मिळाले आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी सदर रेशनिंग दुकानात जाऊन तपासणी केली जाईल. नियमानुसार नागरिकांना शिधा दिला नाही हे तपासात उघड झाल्यास या दुकानदारावर कारवाई केली जाईल.