कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेची बॅनरबाजी
डोंबिवली ( शंकर जाधव ) :
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावं आणि २७ गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी विभागाचे सीईओ व सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली.
सदर बैठकीत १४ गावं आणि २७ गावांमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे. या चर्चेमुळे शिष्टमंडळासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमदार राजेश मोरे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली ही तातडीची कृती नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न १४ गावं आणि २७ गावांना पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
